मुख्य बातमी

अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत यश संपादन केले. यावर्षी मार्च एचएससी २०२६ चा निकाल ९७.९३ टक्के लागला. कला शाखा ९४.२३ टक्के, वाणिज्य शाखा ९९.१८ टक्के, विज्ञान शाखा ९८.७९ टक्के व एम.सी.व्ही.सी. १०० टक्के असे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे.

कला शाखेतून अयमान अमानुल्ला माझगावकर (९४.५० टक्के), गार्गी किरण इनामदार (९३.१७ टक्के), श्रिया अभिजित केळकर (९३.१७ टक्के), तर आस्था राजेंद्र पुनस्कर (९१.१७ टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

वाणिज्य शाखेतून मितेश रविंद्र चिके (९६.८३ टक्के), पार्थ प्रसाद चितळे (९६.३३ टक्के) आणि जान्हवी मनोज सावंत (९५.१७ टक्के) यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले.

विज्ञान शाखेतून सई राजेश अवसरे (९४.६७ टक्के) ही प्रथम, अयमान अनिस दसुरकर (९१.६७ टक्के) ही द्वितीय, तर सलोनी अनंत ताम्हणकर (८८.१७ टक्के) ही तृतीय आली.

एमसीव्हीसीमध्ये रिया मुकेश मयेकर (९४.३३ टक्के), साक्षी संजय हरळीकर (९३.६७ टक्के), तर निर्मिती प्रसन्न सुर्वे (९२ टक्के) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले.

संस्कृत विषयात ७ विद्यार्थ्यांनी, बुक कीपिंग एंड एकाउंटन्सी विषयात ४ विद्यार्थ्यांनी आणि आयटी विषयात ३ विद्यार्थ्यांनी, व गणित विषयात एका विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. व कॉम्प्युटर सायन्स मध्ये एका विद्यार्थ्याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले. वाणिज्य शाखेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३१ आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, उपकार्याध्यक्ष ॲड. विजयराव साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, व सर्व विभाग प्रमुखांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!