रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेतर्फे ‘हळदी-कुंकू’ समारंभ

रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, रत्नागिरी येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात ‘हळदी-कुंकू’ समारंभ आयोजित केला होता. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी तालुका संपर्क प्रमुख दीक्षा आंब्रे आणि अनिशा नागवेकर यांच्या सौजन्याने करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
यावेळी उपजिल्हा संघटिका सायली पवार, उपतालुका संघटक रेखा कोळंबेकर, उपतालुका संघटक गंधाली मयेकर, उपजिल्हा संघटक रशिदा गोडद आणि उपविभाग संघटक मिताली पवार यांसह महिला आघाडी शिवानी माने व अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत महिला संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.



