डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल लांजा आणि पाली शाळेचा निकाल १०० टक्के

रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेच्या लांजा आणि पाली येथील डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांमधून डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल लांजाच्या बासुरी सुधीर पांचाळ हिने ९५.७० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकाविला.b श्रेया संदीप निवळे ही ८४.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर जुवेरिया आदम रखांगी ही ८०.८० टक्के गुण मिळवून तृतीय आली.
त्याचप्रमाणे डी.जे.सामंत इंग्लिश मीडियम स्कूल पाली हायस्कूलमधून अल्फिया जावेद खान हिने ८३.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. राकेश अर्जुन परमार याने ८२.२० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर आयुष उमेश कळंबटे याने ८१ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
संस्थेच्या दोन्ही शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे, लांजा विद्यालयाचे मुख्याध्यापक चारुदत्त उपाध्ये, पाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांचे श्री साईअनिरुद्ध एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रविंद्र उर्फ अण्णा सामंत तसेच सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


