कॉपीमुक्त अभियान पारदर्शकतेसाठी, तर ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ गुणवत्तेसाठी फायदेशीर : राजेश क्षीरसागर

कॉपीमुक्त अभिया पारदर्शकतेसाठी, तर ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ गुणवत्तेसाठी फायदेशीर : राजेश क्षीरसागर
रत्नागिरी : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दहावी परीक्षेतही कोकण विभागीय मंडळ निकालात प्रथम क्रमांकावर आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यार्थी, पालक यांचे हे श्रेय आहे. निकालात मागील वर्षीच्या तुलनेत राज्याच्या निकालात २.०१ टक्के, तर कोकणात १.२ टक्के घट झाली असली, तरी राज्यात कोकणचा क्रमांक प्रथम कायम आहे. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यातील प्रथम क्रमांक कायम राखला आहे, असे कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावर्षीच्या परीक्षेत प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्हीचा केलेला वापर यामुळे निकालातील पारदर्शकता वाढली आहे.तसेच निकालात घट झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात १०० टक्के केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वर्गखोलीत लावण्यात आले होते. मागील वर्षापासून कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात निकालातील गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने बोर्ड परीक्षेचा राजमार्ग ही अभिनव पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यामध्ये शाळांनी वर्षभर करायचे प्रशासकीय व शैक्षणिक नियोजन तसेच परीक्षापूरक उपक्रम यांचा समावेश केलेला आहे. गैरप्रकारमुक्त परीक्षा घेण्यासाठी सहकार्य केलेल्या जिल्हा दक्षता समिती तसेच विभागातील सर्व क्षेत्रीय घटकांचे आभार! उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, अशा शुभेच्छा कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.


