मुख्य बातमी

अंबिकेश्वर प्रतिष्ठानतर्फे चुनाकोळवण महोत्सवाचे आयोजन

राजापूर : तालुक्यातील मौजे चुनाकोळवण येथील अंबिकेश्वर प्रतिष्ठानमार्फत १५ मे रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त ‘चुनाकोळवण महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवात “एक धाव एकीसाठी” जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, आठ गावांतील महिलांचे हळदी-कुंकू, महिला व पुरुषांच्या विविध स्पर्धा, मिश्र-फळ लागवडी संदर्भात मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय मुलांचा बक्षीस समारंभ, मान्यवरांचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजापूर तालुक्यातील मौजे चुनाकोळवण हे निसर्गरम्य सवतकडा धबधबा असेलेले पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलेले गाव आहे. या गावात मौजे चुनाकोळवण अंबिकेश्वर प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, कला-क्रीडा, धार्मिक, विकासात्मक आरोग्य व मार्गदर्शन शिबिरे राबवित असलेली संघटना कार्यरत आहे. या वर्षी या संघटनेला १५ मे रोजी १८ वर्ष पूर्ण होत आहेत.

याचबरोबर ‘उत्सव स्त्री शक्तिचा, खेळ पैठणीचा’ हा आठ गावातील माहिलांसाठी लकी ड्रॉच्या कार्यक्रमाचे व वाघदेवी नमन नाट्य मंडळ, निवली, सावर्डे या मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.

या कार्यकमात जास्तीत जास्त मुंबईकर चाकरमान्यांनी सामील होण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष वसंत मटकर (मो.९९८७६८७८०८) यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!