कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

रत्नागिरी : शहरातील कै. ल. ग.पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या बालवाडी विभागाच्या प्रमुख कामिनी महाडिक, ज्येष्ठ शिक्षक हणमंत ऐवळे, शिक्षक प्रवीण मोरे, छोटीराम सूर्यवंशी, मनोज घाणेकर, अमित वेदरे, सौ. नेहा राजेशिर्के, श्रीमती गायत्री औघडे, श्रीमती धुरी, श्रीमती पांचाळ, श्रीमती फुटक, श्रीमती घाडी, श्रीमती लाड, श्रीमती मुळ्ये, श्रीमती चव्हाण, श्रीमती गुळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माहिती दिली. प्रमुख वक्ते श्री सूर्यवंशी यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील शिक्षणासंदर्भात आणि त्यांच्या सामाजिक, समतविषयक इतर कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती औघडे यांनी केले. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती सांगणाऱ्या गीतावर छान नृत्याचे सादरीकरण केले.



