मुख्य बातमी

गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या वतीने विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण उत्साहात 

गावखडी : रत्नागिरीत तालुक्यातील गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या वतीने विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच क्रिकेट स्पर्धेत विजेता संघ रूद्र इलेव्हन, उपविजेता सुपर मेस्त्री संघ, रोख रक्कम चषक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. यावेळी तयार करण्यात आलेल्या रंगमंचाचे सोमेश्वर जुगादेवी जाकादेवी मानूबाई असे नामकरण करण्यात आले.

गावखडी गुरववाडी येथे क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघाला चषक, रोख रक्कम उपस्थित देऊन गौरविताना मान्यवर. फोटो : दिनेश पेटकर, गावखडी

या प्रसंगी गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गुरव, उपाध्यक्ष विजय गुरव, खजिनदार सुधाकर गुरव, स्थानिक अध्यक्ष रामचंद्र गुरव, विजय पां.गुरव, दत्ताराम गुरव, जितेंद्र गुरव, प्रकाश गुरव, धनंजय गुरव, हेमंत गुरव, प्रमुख पाहुणे मंगेश गुरव, शाखा अध्यक्ष गुरव ज्ञाती समाज उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार गुरव व स्वागत विजय गुरव यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!