थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन ५ डिसेंबर रात्री १० वाजल्यापासून ६ डिसेंबरपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या (ता. जि. रत्नागिरी) वतीने साजरा होणार आहे.
दिनांक ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता समाजातील प्रबोधनकार गायक यांचे श्रद्धांजलीपर गीत गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री १२ वाजता थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दलाच्या सलामीने मानवंदना देण्यात येणार आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता रत्नागिरीतील सर्व बांधवांनी अभिवादन करण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



