खांडोत्रीतील ओबीसी बांधवांचा जनगणनेला तीव्र विरोध

चिपळूण : तालुक्यातील खांडोत्री गावातील ओबीसी बांधवांनी जनगणना प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शवत “जोपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना दिला जात नाही, तोपर्यंत माहिती देणार नाही,” असा ठाम निर्णय घेतला. यावेळी गावात आलेल्या प्रगणक, पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी माघारी पाठवले.
ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद होणे आवश्यक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली. शासनाने जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात सरपंच सौ. सोनम घाणेकर, उपसरपंच अमोल अनंत कोदारे, माजी सरपंच सखाराम सुवरे, कुणबी विकास मंडळ वहाळ मुंबईचे अध्यक्ष अनंत कोदारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच दशरथ मेस्त्री, विष्णू कारेकर, शंकर जड्यार, सोमा सुवरे, सुनील बाईत, जयराम सुवरे, संदीप सुवरे, मारुती कोदारे, महादेव घाणेकर, सुरेश सुर्वे, आत्माराम कातकर, शेखर गांधी, सुभाष घाणेकर, रामचंद्र सुवरे, सुरेश खांबे, दत्ताराम मेस्त्री, दौलत सुवरे, नंदकुमार सुवरे आदी उपस्थित होते.



