क्रीडामुख्य बातमी

रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात संपन्न

विविध वयोगटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी संघाची निवड

रत्नागिरी : जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स व कल्चरल फाऊंडेशन पुरस्कृत रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत करण्यात आले होते. सात, नऊ, अकरा, तेरा, सतरा, एकोणीस वर्षांखालील रत्नागिरी संघाची निवड या स्पर्धांतून पुणे, संभाजीनगर, सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी करण्यात आली. या स्पर्धा रत्नागिरीतील माजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे भरवण्यात आल्या होत्या.

रत्नागिरी संघाची निवड खालीलप्रमाणे :

सात वर्षे वयोगट मुले – मानस भालेकर, आस्तिक कुलकर्णी. तीर्था चव्हाण. नऊ वर्षे वयोगट मुले – अमेय लाटे, शार्दुल आंब्रे. मुली – ईश्वरी सुवरे, मायरीन भोरे. अकरा वर्षे वयोगट मुले – शर्विल शहाणे, विहंग सावंत. मुली – मृण्मयी दांडेकर, स्वरा सकपाळ. तेरा वर्षे वयोगट मुले – ओम तेरसे, मानस नागवेकर. मुली – दांडेकर मृण्मयी, गिरीजा दांडेकर. सतरा वर्षे वयोगट मुले – आयुष रायकर, अलिक गांगुली. मुली – सई प्रभुदेसाई, आर्या पळसुलेदेसाई. एकोणीस वर्षे वयोगट मुले – श्रीहास नारकर, ओम उतेकर, आयुष रायकर, लवेश पावसकर. मुली – सई प्रभूदेसाई, सानवी दामले, आर्या पळसुलेदेसाई, तनया आंब्रे.

या स्पर्धांना पंच म्हणून विवेक सोहनी, चैतन्य भिडे, प्राची मयेकर यांनी काम करून स्पर्धा यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी रायसोनी फौंडेशनचे तसेच सर्व खेळाडू व पालकांचे आभार मानले तसेच भावी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!