मुख्य बातमी

‘समृद्ध ग्रामपंचायत’ स्पर्धेत कळसवली ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल

ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘समृद्ध ग्रामपंचायत’ स्पर्धेत राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमधून कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविला आहे. या उल्लेखनीय यशामुळे गावासह संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावाचा सर्वांगीण विकास, लोकसहभाग, स्वच्छता, मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विविध निकषांवर कळसवली ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात अव्वल स्थान मिळविले.

या यशामागे आमदार किरण सामंत यांचे मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायत अधिकारी सोनाली हिवाळे यांचे विशेष प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच देवेश तळेकर, उपसरपंच, सर्व सदस्य, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील शासकीय कर्मचारी, महिला बचत गट तसेच ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे यश संपादन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील इतर मानांकित ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत खरवते हिने द्वितीय क्रमांक, ग्रामपंचायत गोवळ हिने तृतीय क्रमांक, ग्रामपंचायत ओझर हिने चतुर्थ क्रमांक तर ग्रामपंचायत जूवाटी हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला.

कळसवली ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “समृद्ध ग्रामपंचायतीची वाटचाल” अधिक बळकट करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचेही सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!