मुख्य बातमी

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश नोंदणी २२ जूनपर्यंत

रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया नोंदणी २० मेपासून सुरू झाली असून, २२ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

ऑनलाईन अर्जभरणे २० मे ते २२ जून, कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती २० मे ते २२ जून, तात्पुरती गुणवत्ता यादी २४ जून, गुणवत्ता यादीवरील आक्षेप २५ जून ते ३० जून, अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै असे वेळापत्रक आहे.

ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी संकेत स्थळ https://poly26.dtemaharashtra.gov.in भेट द्यावयाची आहे. कागदपत्र तपासणीसाठी विद्यार्थ्यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यापैकी पहिला पर्याय हा E-Scrutiny (Online Scrutiny) व दुसरा पर्याय हा P Scrutiny (Offline Scrutiny) आहे. विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्यास ऑनलाईन अर्जामध्ये त्यांना केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे दहावीची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसेल त्यांनी अर्जात तो पर्याय रिकामा सोडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.

प्रवेश प्रक्रीये दरम्यान प्रत्यक्ष अर्ज छाननी (P-Scrutiny) निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे (मूळ व छायांकित प्रत) घेऊन प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर अर्जाची छाननी करून घ्यावयाची आहे. तसेच E-Scrutiny (Online Scrutiny) हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे दहावी नंतरचे ६ पदविका अभ्यासक्रम सुरु आहेत त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (१२० प्रवेश क्षमता), यंत्र अभियांत्रिकी (१२० प्रवेश क्षमता), विद्युत अभियांत्रिकी, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी , संगणक अभियांत्रिकी, मेक्याट्रॉनिक्स अभियांत्रिकी प्रत्येकी ६० प्रवेश क्षमतेसह अभ्यासक्रम आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. सी. वाय सिमिकेरी यांनी केले आहे.

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी संस्थेच्या अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.gpratnagiri.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रीये संदर्भातील माहिती त.प. फणसोपकर मो.नं.7276588469 , वि.क. वायकोस मो.नं. 9421858522, प्रा. प. चव्हाण मो.नं. 9403155465, नि. सु. सावला मो.नं. 8806091765, एन. टी. काझी मो.नं. 9284506052 दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!