खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षक नियुक्तीसाठी २९ मेपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत खेलो इंडिया योजनेतून जिल्ह्यात बॅडमिंटन खेळाचे खेलो इंडिया प्रशिक्षण केद्र सुरू आहे. बॅडमिंटन खेळाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षक नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्यास २९ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आपले अर्ज कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात समक्ष सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
१८ ते ४५ वर्षे वयोगट यामध्ये अतिउच्च कामगिरी/गुणवत्ता असल्यास समितीच्या मान्यतेने ५० वर्षेपर्यंत उमेदवारांना संधी देण्यात येईल. ऑलिंपिक, एशियाडगेम्स, जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग, पदक प्राप्त प्रशिक्षणाच्या अनुभवासह. जागतिक करंडक स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, साऊथ एशियन स्पर्धा, संबंधित खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग, पदक प्राप्त खेळाडू प्रशिक्षणाच्या अनुभवासह, रार्ष्टीय किंवा राज्य पुरस्कारार्थी-प्रशिक्षणाच्या अनुभावासह. एन.आय.एस. पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत दर्जाचे अभ्यासक्रम किंवा शारिरीक शिक्षण शास्त्रात पदवी किंवा पदव्यूत्तर पदवीसह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय खेळात पदक प्राप्त शिक्षणाच्या अनुभवासह, राज्यस्तर खेळाडू बीपीएड-एमपीएडसह कमीत कमी १० वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात क्रीडा कार्यकारी अधिकारी, ऐश्वर्या सावंत, (मो.क्र.8975069623) यांचेशी संपर्क साधावा.


