
रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात आंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये रिफिल करण्याचे काम आज (२७ मे) रात्री १० नंतर करण्यात येणार असल्याने प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा मार्गे जाणारी सर्व वाहतूक करूळ – भुईबावडा घाट – गगनबावडा – अनुस्कुरा घाट या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी खबरदारी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हायवे टँप व संबंधित पोलीस ठाण्यांकडून वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



