मुख्य बातमी
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात ३० मे रोजी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा झाल्यानंतर ९ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक केला जाईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. १२.३० वाजता आरती झाल्यानंतर १ वाजता तीर्थ प्रसादाचे वाटप केले जाईल.
या वेळी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.
