रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी अभय महाजन यांची निवडणूक निरीक्षक नियुक्ती
१२ ते १५ जून रत्नागिरीत

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधान परिषेदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक निरीक्षक म्हणून अभय अरविंद महाजन यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
या मतदारसंघाचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी स्तरावरील निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर होणार आहे.
तक्रार व संपर्कासाठी विश्रामगृहात प्रत्यक्ष भेट
निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्यास किंवा निवडणुकीशी संबंधित इतर कोणत्याही तक्रारी व सूचना असल्यास राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवार आणि सर्वसामान्य नागरिक निवडणूक निरीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. श्री. महाजन हे १२ ते १५ जून या कालावधीत शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी येथे मुक्कामी असणार आहेत.
नागरिकांना प्रत्यक्ष भेटी व्यतिरिक्त खालील अधिकृत माध्यमांद्वारेही निवडणूक निरीक्षकांशी संपर्क साधता येईल:
मोबाईल क्रमांक: ९२०९७७४४५४ (9209774454)
ईमेल आयडी: observerrsr@gmail.com



