मुख्य बातमी

जिल्हास्तरीय पेंशन अदालत १५ जून रोजी

रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने १५ जून रोजी दुपारी ३ वाजता विभागीय डाक कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेंशन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. पेन्शन अदालमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचे ३ महिन्यांच्या आत निपटान झालेले नाही अशा प्रकारणांचा डाकं पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. आपला अर्ज डी एस कुलकर्णी, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे दिनांक १२जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. १२ जूननंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!