कचऱ्यात फेकलेली शासनाच्या पोषण आहाराची पाकीटे ताब्यात घेत दिले चौकशीचे आदेश
गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांची कार्य तत्परता : मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मानले आभार

आबलोली (संदेश कदम) : शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकीटे कचऱ्यात टाकल्याचा प्रकार नुकताच गुहागर तालुक्यातील जानवळे फाट्याजवळ दिसून आला. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर हे आक्रमक झाले. त्यांनी या प्रकाराची माहिती देऊन एक्सपायर डेट संपली नसतानाही कचऱ्यात फेकलेली शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे शाळेची की अंगणवाडीची असा गंभीर प्रश्न उपस्थित करून तात्काळ चौकशी करावी, याबाबत शासन प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास मनसेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी दिला होता.

याबाबत गुहागर तालुक्याचे कार्य तत्पर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थ यांच्या समवेत घटनास्थळी जाऊन कचऱ्यात टाकलेली शासनाच्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकिटे पंचनामा करून ताब्यात घेतली व तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकारी श्री. भिलारे यांचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. जानवळकर यांनी आभार मानून धन्यवाद दिले.



