मुख्य बातमी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टा

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाकडील १८ मे रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका २०२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. यास्तव भारत निवडणूक आयोगाकडील २ जानेवारी २०२४ मधील आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या तरतुदीनुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने या मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.



