मुख्य बातमी
गावखडीत दहा दिवसांच्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप

गावखडी : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करीत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात अनंत चतुर्दशी दिवशी (७ सप्टेंबर) निरोप दिला.
कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारी गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या… एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार… असा जयघोष करीत गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

दहा दिवसांच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक गावखडी येथे काढण्यात आली. पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनाला अडचण आली नाही. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर “गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो, आम्हाला सुखी ठेव तसेच आमची भातशेती चांगली होऊ दे, पीक आमच्या हाती मिळू दे,” असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले.



