मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २८ वर्षीय तरुणाला अटक

राजापूर : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत २८ वर्षीय संशयिताला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश काशीराम गुरव (वय २८, रा. तळवडे, ता. राजापूर) याने पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडितेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम बाणे, पोलिस कॉन्स्टेबल निलेश कात्रे, स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(२), ७६ तसेच पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस सहाय्यक निरीक्षक दीपज्योती पाटील करीत असून, घटनेशी संबंधित सर्व पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!