मुख्य बातमी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांची जयंती साजरी

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले झाडगाव(रत्नागिरी) येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात ८ जून रोजी कोकण कृषी विद्यापीठाचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. बाळासाहेब सावंत यांची जयंती साजरी करण्यात आली.

केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले. डॉ. चौधरी यांनी डॉ. बाळासाहेब सावंत यांनी कोकणातील शेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेले कार्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी, मत्स्यव्यवसाय, बागायती आणि ग्रामीण विकास क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर, सहाय्यक संशोधन अधिकारी डॉ. मनोज घुघुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, तसेच वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्वा सावंत, महेश किल्लेकर, मनिष शिंदे, सचिन पावसकर, सुहास कांबळे, सचिन चव्हाण, प्रवीण गायकवाड, भूमी भाटकर, श्री. पेडणेकर, स्वप्नील आलीम, प्रशांत पिलणकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!