मुख्य बातमी

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा काळात विद्यार्थी व पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळाने विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन (काउन्सिलिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी केले आहे.

परीक्षांचे वेळापत्रक : इयत्ता १२ वी (HSC) परीक्षा: १६ जून ते ८ जुलै आणि इयत्ता १० वी (SSC) परीक्षा: १६ जून ते ३० जून.

विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटू नये किंवा इतर मानसिक अडचणी येऊ नयेत यासाठी ८ जूनपासून परीक्षा संपेपर्यंत समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थी संदीप दत्ताराम शिर्के (९५५२०६४६४०), भाग्यविधाता भास्कर वारंग (९४२३२१३२४०) या समुपदेशकांशी पालक व विद्यार्थी संपर्क साधू शकतात. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाने विभागीय सचिव पुनिता गुरव (९०११२६२८४०), विभागीय सहाय्यक सचिव प्रेरणा शिंदे (९६७३०८००७७), पर्यवेक्षक लिपिक अनिल पवार (इ. १२ वी) ९६७३MT१२६७ (९६७३१२१२६७), पर्यवेक्षक लिपिक राजेंद्र यादगिरे (इ.१० वी) (९४२०५१८२१३), लेखा व भांडार शाखा गजानन जाधव (८०८७७४६१२२) या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे:

विद्यार्थी आणि पालकांसाठी ०२३५२ २३१२५० हा मुख्य हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध असून, यावर सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत संपर्क साधता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!