मुख्य बातमी

आर. बी. शिर्केच्या बेस्ट कॅडेट प्रेम पाटील याचा एनसीसी कमांडिंग ऑफिसर दीक्षित यांच्या हस्ते सन्मान

रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी रत्नागिरी या कार्यालयाच्या विद्यार्थी आर. बी. शिर्के शाखेच्या विद्यार्थ्यांना बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर झाला असून मंगळवारी कमांडर रामांजुल दीक्षित (कमांडिंग ऑफिसर, २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी. रत्नागिरी) यांच्या हस्ते या विद्यार्थ्याचे सत्कार समारंभ व बेस्ट कॅडेट अवॉर्ड तसेच धनादेश देण्यात आला.

एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेटना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. CWS बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल प्रेम पाटील याला सत्कार समारंभात दीक्षित यांनी गौरव करून व भविष्यकाळासाठी उत्तम मार्गदर्शन केले. प्रेम पाटील यांच्या या यशाबद्दल यशवर्धन एनसीसीचे कमांडर रामांजुल दीक्षित यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

यावेळी कमांडर रामांजुल दीक्षित, समादेश अधिकारी, सी आय अंकित, पेटी ऑफिसर निशांत खताल एलकॉम, अमिजित कमते पीओ लॉग, परमेश्वर खोकले, प्रभारी मुख्य लिपिक, पूनम माने आस्थापना लिपिक, अंकिता जाधव आवक जावक लिपिक, स्नेहल साळवी ट्रेनिंक लिपिक, विकी कांबळे सीओ वाहनचालक, सुचिता साळवी शिपाई, संकेत कांबळे सफाईगार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!