मुख्य बातमी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रत्नागिरीत १४ जूनला विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

रत्नागिरी : चिपळूण, लांजा तालुक्यांतील ग्रामीण भागांपासून ते शहरे – महानगरे यांपर्यंत दिसणारा ‘लव्ह जिहाद’ आता हायटेक होऊन आयटी कंपन्या आणि राष्ट्रीयीकृत बँकांसारख्या उच्चभ्रू कॉर्पोरेट क्षेत्रात पोहोचला आहे. नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनी, मुंबईतील ‘एसबीआय’ बँक आणि पुण्याच्या ‘विप्रो’ कंपनीत नुकतेच उघडकीस आलेले हिंदू महिलांचे धार्मिक छळ आणि बळजबरीने धर्मांतराचे प्रयत्न हे एका मोठ्या देशव्यापी संकटाचे संकेत आहेत. या ‘कॉर्पोरेट जिहाद’चे नेमके सत्य काय? हे समाजासमोर आणण्यासाठी रविवारी (१४ जून) सायंकाळी ४ ते ६:३० या वेळेत शहरातील जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, माळनाका, रत्नागिरी येथे एका विशेष कार्यक्रमाचे होणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज यांनी दिली.

याविषयी आज (११ जून) आयोजित पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष गणेश गायकवाड, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संदीप नाचणकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे आणि श्री हनुमान मंदिर, कोकण नगरचे विश्वस्त किशोर भुते उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना ‘लव्ह जिहाद’चे नवे हायटेक स्वरूप आणि भीषणता याविषयी राष्ट्रीय प्रवक्ते श्री. शिंदे म्हणाले की, “संस्थात्मक छळ हा केवळ वैयक्तिक प्रेमाचा विषय नसून, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर बसलेल्या विशिष्ट मानसिकतेच्या अधिकाऱ्यांकडून आणि मुस्लिम महिला सहकाऱ्यांकडून हिंदू महिलांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी, नोकरीवरून काढण्याची धमकी देऊन पद्धतशीरपणे मानसिक दबाव आणला जात आहे. सध्या समोर आलेली काही प्रकरणे ही केवळ हिमनगाचे टोक असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील हिंदू महिलांच्या सुरक्षेचा आणि कंपन्यांच्या अंतर्गत व्यवस्थापनाचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.”

या देशव्यापी षडयंत्राचे बिंग फोडण्यासाठी आणि नोकरदार भगिनींच्या रक्षणासाठी राष्ट्रीय प्रवक्ते श्री. शिंदे, सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अधिवक्त्या प्रीती राऊत या विशेष संवादात धक्कादायक बाबी उघड करणार आहेत. हा विषय संपूर्ण हिंदू समाजाच्या सुरक्षिततेशी जोडलेला असल्याने रत्नागिरीतील सर्व नागरिक, महिला आणि युवकांनी या संवादाला अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अन्यायग्रस्त महिलांनी मदतीसाठी ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!