मुख्य बातमी

‘स्वरस्नेह’ मैफलीत शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध

कलांगण, स्वराभिषेकचा उपक्रम; मुंबई व रत्नागिरीतील कलाकार

रत्नागिरी : मुंबईतील ‘कलांगण’ संस्था आणि येथील ‘स्वराभिषेक’ संस्थेच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वरस्नेह’ ही शास्त्रीय गायनाच्या मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुंबई आणि रत्नागिरीतील कलाकारांनी एकत्रित केलेल्या सादरीकरण पाहून शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळेल, असे मत कलांगणच्या संचालिका, ज्येष्ठ संगीतकार-गायिका डॉ. वर्षा भावे यांनी व्यक्त केले.

कलांगण आणि स्वराभिषेक तर्फे गेली चार वर्षे हा उपक्रम राबवला जातो. रत्नागिरी आणि मुंबईत दर तीन महिन्यांनी एकत्रित मैफल होते. त्यात शास्त्रीय गायनातील ज्ञानाची आदानप्रदान होते. त्यातून अनेक चांगले गायक तयार होत आहेत. काल (ता. ३) येथील प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाच्या रंगमंचावर मैफल रंगली. यामध्ये डॉ. वर्षा भावे यांचे सुप्रिया वायचोळ, दीप्ती आंबेकर आणि निआ धुरू या शिष्या, तर रत्नागिरीतील स्वराभिषेकच्या सौ. विनया परब यांच्या दीप्ती आगाशे, स्वरा भागवत आणि गौतमी वाडकर या शिष्यांनी गायन केले.

सुप्रिया वायचोळ यांनी भीमपलास रागातील बडा ख्याल, छोटा ख्याल, त्यानंतर निआ धुरू हिने राग जौनपुरीतील छोटा ख्याल, गौतमी वाडकर हिने पुरिया रागातील बंदिश, दीप्ती आंबेकर यांनी मधुवंती, तर दीप्ती आगाशे यांनी शंकरा आणि स्वरा भागवत हिने यमन रागातील बडा व छोटा ख्याल सादर करून शास्त्रीय गायनातील आपली तयारी दाखवून दिली. त्यांना मीरा बापट आणि तन्वी मोरे यांनी तानपुरासाथ, विद्या कंठी आणि मंगेश मोरे यांनी संवादिनीसाथ, तर केदार लिंगायत यांनी तबलासाथ केली. एस कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले. सौ. पूर्वा यांनी यांनी निवेदन केले. मठाचे व्यवस्था राम पानगले आणि पालकांचे सहकार्य लाभले. मैफलीला स्वराभिषेकचे शिष्य, तसेच संगीतप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कलाकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!