मुख्य बातमी
रत्नागिरीतील विमानतळामुळे पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीतील विमानतळ हे केवळ दळणवळण वाढवणार नाही, तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती देणार आहे, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
काल (१५ जून) रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी विमानतळाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि सविस्तर आढावा घेतला. यावेळी काम अत्यंत दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार होत आहे. या विमानतळाच्या माध्यमातून रत्नागिरीसह कोकण भूमीच्या विकासाची ही झेप अशीच पुढे जात राहील, हा विश्वास आहे, असे यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले.



