मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गाव, प्रभाग, आणि जिल्हा स्तरावर युवासेना मजबूत करणार : तुषार साळवी

उद्योगमंत्री उदय सामंतांच्‍या मार्गदर्शनाखाली युवावर्गाच्‍या उन्नतीसाठी काम करणार

चिपळूण : शहर व ग्रामीण भागातील युवा वर्गाला भगव्‍या झेंड्या खाली एकत्र आणत युवासेनेची फळी भक्‍कम करण्‍याच्‍या दृष्‍टीने शिवसेना युवासेनेचे नुतन जिल्‍हाप्रमुख तुषार साळवी यांनी पावले टाकली असून तरुणांच्‍या शिक्षण, आरोग्‍याविषयक समस्‍या आणि रोजगाराविषयी काम करण्‍याच्‍या दृष्‍टीने चिपळूण येथील पहिल्‍याच बैठकीत चर्चा करण्‍यात आली. शिवसेना नेते व राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जिल्‍ह्यात अपेक्षित असलेली युवा सेना उभारण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. ‘गाव तेथे युवा सेनेची शाखा’ ही संकल्‍पना राबवण्‍यावर चिपळूण तालुका आढावा बैठकीत बोलून दाखवला. युवा सेनेची बूथ कमिटी (BLA) अधिक सक्षम करणे. प्रत्येक महाविद्यालयांमध्ये युवा सेनेचे युनिट तयार केले जाणार आहे.

शिवसेना नेते, राज्‍याचे उद्योगमंत्री आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आ. किरण भैय्‍या सामंत, युवासेना कार्याध्‍यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना कोकणचे सचिव विकास गोगावले, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्‍या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे दक्षिण रत्‍नागिरीचे नुतन जिल्‍हाप्रमुख तुषार साळवी यांनी चिपळूणपासून राजापूरपर्यंत कार्यकर्‍त्यांच्‍या भेठीगाठीसाठी दौर्‍याला प्रारंभ केला. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्‍हाण, नगराध्‍यक्ष उमेश सकपाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली चिपळूणमध्‍ये नगराध्‍यक्ष उमेश सकपाळ यांच्‍या जनसंपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी युवासेनेच्‍या शहर आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

या बैठकीच्‍या सुरुवातीलाच युवासेना रायगड-रत्‍नागिरीचे जिल्‍हा सरचिटणीस उमेश खताते व युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, युवासेना संपर्कप्रमुख अवधुत शिर्के, शहरप्रमुख विनोद पिल्‍ले यांनी तुषार साळवी यांचे स्‍वागत केले.

जिल्‍ह्यामध्‍ये युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्‍यावर या बैठकीत साळवी व उपस्‍थितांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेप्रमाणेच जिल्‍ह्यात युवासेनेची फळी भक्‍कम करण्‍यासाठी युवा वर्गाला गावागावात, प्रभागात जाऊन जोडले जाणार आहे. शिवसेना शाखांप्रमाणेच युवावर्गाचीही शाखा निर्माण करुन, जास्‍तीतजास्‍त युवावर्गाला एकत्र आणत त्‍यांच्‍या भविष्‍यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहे. युवा सेना मजबूत करण्यासाठी लवकरच सदस्य नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्‍या अपेक्षेप्रमाणे युवा वर्गाच्‍या उन्नतीसाठी युवासेनेला रत्‍नागिरी जिल्‍ह्यात वाटचाल करायची असल्‍याची संकल्‍पना तुषार साळवी यांनी मांडली. तालुका आणि शहरामध्‍ये ज्‍याठिकाणी पदाधिकारी नाहीत, त्‍याठिकाणी पदाधिकार्‍यांच्‍या नियुक्‍त्‍या करून कार्यकारिणी पूर्ण करण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी आढावा घेताना केल्‍या. युवकांना जाणवणार्‍या समस्‍या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्‍या समसयांवरही बैठकीत चर्चा करण्‍यात आली. नव मतदार नोंदणी आणि बूथ कमिटी (BLA) अधिक सक्षम करण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!