मुख्य बातमी

दुःख मांडणं हेच खऱ्या लेखकाचे आणि कलावंताचे काम : लेखक पवन भगत

रत्नागिरी : समाजातील दुर्लक्षित घटकाचे दुःख मांडणे हेच खऱ्या लेखकाचे, कलावंताचे काम आहे. कोरोनातील टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित मजूर वर्गाची होरपळ मांडण्याचा माणूस म्हणून प्रयत्न केला त्यातून ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी आकारास आली, असे मनोगत लेखक पवन भगत यांनी व्यक्त केले

सामाजिक भान असलेले लेखक पवन भगत हे नुकतीच नवनिर्माण शिक्षण संस्थेला भेट दिली. त्या प्रसंगी त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांचे लेखन कार्य, समाजाप्रती जबाबदारी, चळवळीतील काम, साहित्याचे समाजातील स्थान आणि त्यांच्या कादंबरी संदर्भात झालेला वाद या सर्व विषयांवर मोकळेपणाने विचार मांडले.

मुलाखतीतून त्यांनी कोरोना महामारीच्या काळात भारताच्या विविध महानगरांत स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल अत्यंत वेदनादायी होते. ती वेदना कमी करण्यासाठी मी काय करू शकतो तर ती शब्दबद्ध करून लोकांसमोर मांडू शकतो म्हणून अस्वस्थ मनाने मी कादंबरी लिहिली. त्यातून पैसे मिळवणे हा हेतू नव्हता तर मला ती माझी कलावंत म्हणून नैतिक जबाबदारी वाटली.

पवन भगत यांची ‘ ते पन्नास दिवस’ कादंबरी अमरावती विद्यापीठात अभ्यासक्रमात होती पण देशविरोधी म्हणून ती अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. त्यावर न्यायालयात दाद मागण्यात आली आणि न्यायालयाने ती पुन्हा अभ्यासक्रमात घेण्याचा निर्णय दिला. यावरून या कादंबरीवर बरीच चर्चा झाली.

त्याबद्दल बोलताना भगत म्हणाले, अभ्यासक्रमात ती असावी म्हणून मी ती लिहिली नव्हती त्यामुळे व्यक्तिगत मला काही फरक पडत नाही पण ज्या कारणाने ती काढून टाकण्यात आली ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न वाटतो आणि तो भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे अशी भावना भगत यांनी व्यक्त केली.

मी माझ्या कादंबरीचे अनेक भाग मी कोणत्याही हक्काशिवाय अनेकांना वापरण्यासाठी दिले आहेत. असे मत कादंबरिकार पवन भगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि कादंबरीकार पवन भगत यांची मुलाखत प्रा. अश्विनी कांबळे यांनी घेतली. कार्यक्रमाचे अध्याक्षीय मनोगत कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सुकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांच्यासह प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!