“बालजगत”मधून २८ जून रोजी उलगडणार पावसाची गंमत

रत्नागिरी : दरवर्षी सगळ्यांना वाट बघायला लावणारा पाऊस आपली वेगवेगळी रूप दाखवत असतो. हीच पावसाची गंमत ऐकायला मिळणार आहे पाऊस गाणी या कार्यक्रमामधून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. बाल जगत या लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात २८ जून रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पाऊस गाणी हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील छोटे गायक कलाकार रुद्राणी मुळ्ये, त्रिशा पेंडसे, कपिश माईणकर, कौशिकी रानडे, इरा भाटवडेकर, कौशिकी नवाथे आणि सावनी सरपोतदार यांनी ही पाऊसगाणी गायली आहेत.
त्यांना हार्मोनियमसाथ ओजस करकरे, तबलासाथ स्वरूप नेने, इतर तालवाद्य स्वराज्ञी सरपोतदार, सूत्रनिवेदन सावनी सरपोतदार आणि या छोट्या गायक कलाकारांना संध्या सुर्वे यांनी मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमाचे निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत यांचे असून सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत.
1143 Khz मध्यमलहरी, 101.5 Mhz एफ. एम. वाहिनी आणि Newsonair मोबाईल अँपवर या कार्यक्रमाचे प्रसारण थेट ऐकू येईल. कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर airratnagiri1248 या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम रसिकाना पुन्हा ऐकता येईल. लहान मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा बाल जगत हा कार्यक्रम अवश्य ऐकावा असे आवाहन करण्यात आले आहे.



