मुख्य बातमी

शिर्के प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

रत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. साखळकर होत्या. प्रमुख वक्ते प्रशालेतील शिक्षक श्री. कुवर यांनी छत्रपती शाहू महाराजांचे शिक्षण, आरोग्य व शेतीबद्दलचे उदात्त धोरण स्पष्ट केले. शाहू महाराजांची समाजाबद्दलची दूरदृष्टी आणि राज्यकारभाराची पद्धत विद्यार्थ्यांना समजावली. अध्यक्षीय भाषणात सौ. साखळकर यांनी महाराजांचे लोकाभिमुख प्रशासन, सर्वधर्मसमभाव, समता व न्याय यांबद्दलचे विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कांबळे, सूत्रसंचालन श्री. पाटील व आभारप्रदर्शन श्री. महाले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!