ग्राहक पंचायतीतर्फे २ जुलै रोजी रस्ता सुरक्षा जनजागृती आणि खुल्या संवादाचे आयोजन

रत्नागिरी : ग्राहक पंचायत रत्नागिरी यांच्या वतीने तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवनिर्माण कॉलेज यांच्या सहकार्याने उद्या (२ जुलै) रस्ता सुरक्षा जनजागृती आणि खुल्या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवनिर्माण महाविद्यालयात दुपारी २ वाजता होणार आहे.
सध्या रस्ता अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. वाढती वाहने, अपुरे रस्ते या सोबतच वाहन चालकांची बेपर्वाई यांचा हा परिणाम दिसून येतो. या साठीच नव्याने वाहन चालवण्यासाठी परवाना मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे आणि वाहन चालवण्यासाठी अधिक सतर्क राहणे बद्दल मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.
या कार्यक्रमात परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, एकता दुचाकी मेकॅनिक असो.चे फैय्याज खतीब हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी परिवहन अधिकारी श्री. करपे यांच्या सोबत मुक्त संवादाची संधीही उपस्थितांना मिळणार आहे.
ग्राहक पंचायत रत्नागिरी संस्था ही सामाजिक जाणीव जपणारी संस्था असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सत्यवान कोत्रे आणि राजेंद्र कदम यांनी केले आहे.



