मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अंजणारी घाटात ट्रेलरचा अपघात

लांजा : तालुक्यातील अंजणारी घाटात समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर रस्त्याच्या दुभाजकावर आपटून अपघात झाला. अपघातानंतर ट्रेलरचा चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. एमआयडीसी रत्नागिरी अग्निशमनच्या जवानांनी अथक परिश्रमाने चालकाला सुखरूप बाहेर काढले. हा अपघात आज (३ जुलै) सकाळी ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास झाला.

या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक मैदाड, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत घुले, एएसआय तळेकर, हेड कॉन्स्टेबल दोरखंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

केबिनमध्ये अडकून पडलेल्या ट्रेलरच्या चालकाला बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक-यंत्रचालक हर्षल आखाडे, अग्निशमन कर्मचारी प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांनी अथक प्रयत्न केले.

दरम्यान, अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!