मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दख्खन ते कळकदरादरम्यान रस्त्यावर दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

वाहनचालकांनी सावधपणे प्रवास करण्याचे आवाहन

संगमेश्वर : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील दख्खन ते कळकदरा यांच्यामध्ये रस्त्यावर दरड कोसळली. ही घटना आज (३ जुलै) सकाळी नऊ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धडकी.

जिल्ह्यात गेले चार दिवस सातत्याने पाऊस सुरू असून, जिल्हाभरात अनेक ठिकाणी पडझडीचे घटना वारंवार घडत आहेत. गेले दोन दिवस रस्त्यावर दरड कोसळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आज सकाळी दख्खन ते कळकदरा यांच्यामध्ये रस्त्यावर दरड आली. सद्यस्थितीत दक्खन ते कळकदरा हा एकेरी मार्ग बंद आहे; मात्र ही भली मोठी दरड सध्या वाहतूक सुरू असलेल्या महामार्गाच्या अत्यंत जवळ आली आहे.

चार पदरी रस्त्याच्या मधोमध लोखंडी कंपाउंड असल्यामुळे दरड वाहतुकीच्या मार्गावर आली नसली तरी दगडीचे काही तुकडे महामार्गावर आले असल्याने वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेता वाहनचालकांनी वाहने सावधपणे चालविण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!