क्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त कोतळूक येथे कबड्डी स्पर्धा

आबलोली : भारतीय जनता पार्टीचे गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमन याचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी यांच्यावतीने गुहागर तालुकास्तरीय मातीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ आणि २८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रामदेवता सहाणेसमोर होणार आहे.

गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने संलग्न असलेल्या ८ संघांमध्ये साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून प्रथम क्रमांकास रोख रक्कम १० हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम ५ हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास व चतुर्थ क्रमांकास विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, पकड अशी वैयक्तिक बक्षीसे दिली जाणार आहेत.

या स्पर्धेदरम्यान भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा वाढदिवस २७ मार्च रोजी रात्री १० वाजता साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व क्रीडाप्रेमी, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!