मुख्य बातमी

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी व‌ लिओ क्लब ऑफ रत्नागिरीचा पदग्रहण सोहळा संपन्न

लायन्स'चे अध्यक्ष लायन सुमित ओसवाल, तर 'लिओ'चे अध्यक्ष अमृत गोरे यांनी घेतली शपथ

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ४ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक लायन सुमीत भैरूमल‌ ओसवाल‌ MJF यांनी अध्यक्ष म्हणून तसेच ओसवाल मेडिकलचे सर्वेसर्वा लायन ललित शहा यांनी सचिव म्हणून व दर्पण फोटो स्टुडिओ चे लायन प्रदीप हर्चिरकर यांनी खजिनदार म्हणून शपथ घेतली.

या पदग्रहण सोहळ्यासाठी पदप्रदान अधिकारी म्हणून मसूर क्लबचे माजी प्रांतपाल PDG लायन जगदिश पुरोहित PMJF,(Vice area GAT leader) यांना आमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्याची सुरुवात गणेश वंदनेने झाली. नृत्यार्पण ॲकॅडमीच्या नृत्यांगना यांनी अप्रतिम सादरीकरण केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ वायंगणी या शाळेला एक कपाट प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी मावळते अध्यक्ष लायन संजय पटवर्धन MJF, मावळते सचिव लायन‌ शरद नागवेकर, मावळते खजिनदार लायन मनोज सावंत, मावळते लिओ अध्यक्ष शशांक तांबे यांनी आपली मनोगते मांडली व वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेत सर्व सदस्यांचे आभार मानले.

अध्यक्ष सुमीत ओसवाल यांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या सदस्यांना सुद्धा त्यांच्या पदांप्रमाणे शपथ देण्यात आली. यात लायन दीप्ती फडके, लायन ओंकार फडके, लायन मनोज सावंत, लायन डॉ. शिवानी पानवलकर, लायन डॉ. सचिन पानवलकर, लायन शिल्पा पानवलकर, लायन‌ पराग पानवलकर, लायन‌ मोना ओसवाल, लायन श्रीपाद केळकर, लायन श्रेया केळकर, लायन डॉ. संतोष बेडेकर, लायन सुप्रिया बेडेकर, लायन‌ प्राची शिंदे, लायन अस्लम वस्ता, लायन ॲड. शबाना वस्ता, लायन अभिजीत गोडबोले, लायन डॉ. शैलेंद्र भोळे, लायन दीपक साळवी, लायन हर्षद पवार, लायन संजय पटवर्धन, लायन डॉ. गणेश कुळकर्णी, लायन डॉ. रमेश चव्हाण, लायन हेरंब पटवर्धन, लायन सुधीर वणजू, लायन अमेय विरकर, लायन विशाल ढोकळे, लायन सुनीलदत्त देसाई, लायन नित्यानंद भुते या सर्व सदस्यांचा समावेश आहे.

लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी बरोबरच लिओ क्लब ऑफ रत्नागिरी चा ही पदग्रहण सोहळा या प्रसंगी पार पडला. नवनिर्वाचित अध्यक्ष लिओ अमृत गोरे, सचिव म्हणून लिओ ऋतुजा शिंदे व खजिनदार म्हणून लिओ चिन्मय प्रभू यांनी शपथ घेतली. पदग्रहण सोहळा पार पडल्यानंतर नुतन अध्यक्ष लायन सुमीत यांनी सर्व कार्यकारी सदस्यांचा व मावळत्या पदाधिकाऱ्यांचा तसेच बहुप्रांतीय परिषदेत मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लायन सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान केला. नवनिर्वाचित रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, झोन‌‌ चेअरमन शिल्पा पानवलकर व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी नुतन पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या संपूर्ण वर्षासाठी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.

या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन लायन अभिजीत गोडबोले व लायन‌ श्रेया केळकर यांनी केले. येणाऱ्या संपूर्ण वर्षभरात समाजातील विविध घटकांसाठी जे काही चांगलं काम करता येईल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही लायन्स अध्यक्ष सुमीत यांनी दिली. क्रेडाई ची सुद्धा संपूर्ण टीम या सोहळ्यासाठी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!