मुख्य बातमी

डॉ. मधुरा सावंत यांची ७ एप्रिल रोजी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर मुलाखत

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात डॉ. मधुरा सावंत यांनी हॅप्पी हार्मोन्स या वेगळ्या विषयावर संवाद साधला आहे. सोनाली सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे.

आकाशवाणीवर इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर जाणकारांशी संवाद साधला जातो. या प्रमाणेच यावेळी हा वेगळा विषय श्रोत्यांसमोर उलगडणार आहे. आपल्या शरीरात काही असे हार्मोन्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला आनंद वाटतो. या हार्मोन्सची गरज काय आहे, हे नेमके कोणते हार्मोन्स आहेत, स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी त्यांच महत्त्व कशाप्रकारे असतं अशा विविध मुद्द्यांवर डॉक्टर मधुरा सावंत यांनी दिलेली माहिती इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राच्या 1143 किलो हर्ट्झ या मध्यमलहरी वाहिनीवर तसेच 101.5.1 मेगा हर्टझ या एफ एम वाहिनीवर आणि newsonair या लाईव्ह मोबाईल ॲप वर हा कार्यक्रम ऐकू शकतात. याशिवाय कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर हा कार्यक्रम एआयआर रत्नागिरी या यूट्यूब चैनल वर ही ऐकण्यासाठी उपलब्ध होईल.

या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे असून श्रोत्यांच्या ज्ञानात भर टाकणारा हा कार्यक्रम जास्तीत जास्त श्रोत्यांनी आवर्जून ऐकावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!