मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोलीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते गोविंद पागडे यांचे निधन

आबलोली (संदेश कदम) : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या मंडळाचे सचिव तसेच नमन, नाट्य कलाकार आणि गोविंद भिकाजी पागडे (वय ५१) यांचे ३ जुलै रोजी पहाटे २ वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी समजताच आबलोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

यांच्या पश्चात भाऊ सुभाष भिकाजी पागडे, दोन बहिणी, भावजय आणि दोन पुतणे असा मोठा परिवार आहे. कै. गोविंद पागडे यांचा दशक्रिया विधी तसेच सर्व विधी १२ जुलै रोजी वरची पागडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!