मुख्य बातमी

छोट्या व्यावसायिकांना भाजपच्या वतीने पावसाळी स्टँड छत्रीचे वाटप

रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे, रानभाज्या व गावात उत्पादित होणारे प्रक्रिया पदार्थ विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहराच्या वतीने व्यावसायिक पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. निलेश आखाडे यांच्या नेतृत्वाचा उपक्रम राबवण्यात आला.

प्रभागातील छोटे व्यावसायिक आपल्या उपजीविकेसाठी ऊन, वारा, पाऊस न पाहता व्यवसाय करत असतात. त्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागात उत्पादित होणारा शेतमाल, भाजी, फळे, रानभाज्या शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या व्यावसायिकांना मदत व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहराच्या वतीने त्यांना पावसाळी छत्र्या उपलब्ध करून देण्यात आल्या.

शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या माध्यमातून या छत्र्या उपलब्ध झाल्या. शहर सरचिटणीस निलेश आखाडे, पूजा पवार, प्रज्ञा टाकळे, तेजस पवार, संदीप सावंत, निधी आखाडे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रभाग ७ मधील छोट्या व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात व्यवसाय करताना छत्रीमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याने व्यावसायिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व भाजपचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!