एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात भित्तिपत्रक अनावरण, निबंध स्पर्धा तसेच पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत लोकसंख्या, विकास आणि जनजागृती या विषयांवर प्रभावी मांडणी केली.
नवनिर्माण ज्युनियर कॉलेज पोस्टर स्पर्धेचा निकाल असा :
प्रथम – सना निंबाळ, द्वितीय – समीक्षा काटे, तृतीय – महक खोपेकर व विधी कापडी. निबंध स्पर्धा : प्रथम – अक्षदा माने, द्वितीय – सना निंबाळ, तृतीय – सादिन खान व रिया माटल.
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय निबंध स्पर्धेचा निकाल असा :
प्रथम – पूजा शर्मा (टीवाय बीएमएस), द्वितीय – तन्वी कळंबटे (एफवाय बीए), तृतीय – शर्वरी घडशी (टीवाय बीकॉम), चौथा – राधिका देवरुखकर (एफवाय बीएमएस). उत्तेजनार्थ – विनय बोले (एफवाय बीए) व आयशा सावकार (टीवाय बीए).
पोस्टर स्पर्धा : प्रथम – रिया उके (एफवाय बीएमएस), द्वितीय – सना मजगांवकर (टीवाय बीकॉम), तृतीय – इन्शा धामसकर (एफवाय बीए), चौथा – सानिया पवार (टीवाय बीए). उत्तेजनार्थ – ईश्वरी देसाई (एफवाय बीएमएस) व सलोनी सागवेकर (एफवाय बीबीआय).
कार्यक्रमात वाढत्या लोकसंख्येचा देशाच्या विकासावर होणारा परिणाम, लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व तसेच भारतासमोरील आर्थिक व सामाजिक आव्हाने यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी वाढती लोकसंख्या काही देशांसाठी संधी ठरत असली, तरी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी लोकसंख्या विषयक जनजागृतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. सुशील साळवी, प्रा. वर्षा कुबल, डॉ. राजेश कांबळे, प्रा. अश्विन कांबळे, प्रा. निकिता नलावडे, प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. तेजस्विनी पवार तसेच महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवर्ग व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.



