मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कशेडी घाटात दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम : प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलादपूरजवळ (जि. रायगड) धामणदिवी गावाच्या हद्दीत ही घटना घडली असून, कोकणातून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यंत्रणांकडून जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू केली आहे. मात्र, या पर्यायी व्यवस्थेमुळेही महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळावा. प्रवासापूर्वी वाहतुकीची सद्यस्थिती जाणून घ्यावी आणि प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!