मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

संतोष पालशेतकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार

आबलोली (संदेश कदम) : येथील संतोष पांडुरंग पालशेतकर यांनी शासकीय सेवेत प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त गुहागर तालुका चर्मकार समाज यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने संतोष पांडुरंग पालशेतकर आणि त्यांच्या पत्नी शैला पालशेतकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संतोष पालशेतकर यांनी ग्रामीण भागातून सामाजिक सेवेचा आपला प्रवास सुरू करत त्यांनी आपल्या जिद्दने आणि मेहनतीच्या बळावर आरोग्य सेवेत वर्ग ४ कर्मचाऱ्यांपासून पदोन्नती घेत कनिष्ठ सहाय्यक या पदापर्यंत उल्लेखनीय मजल मारली.

याबरोबरच त्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये संचालक पदावर काम केले. या कालावधीत त्यांनी आपल्या उच्च विद्याविभूषित केले. तसेच नि:स्वार्थीपणे समाजाची सेवा करत केली. शासकीय सेवेबरोबरच समाजसेवेमध्येही संतोष पालशेतकर यांचे योगदान मोलाचे आहे. सामाजिक स्तरावर त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

यावेळी गुहागर तालुका चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष विजय जानवळकर, जिल्हा कार्यकारणी स्वीकृत सदस्य विनोद जानवळकर, ज्येष्ठ सल्लागार अशोक जानवळकर, जानवळे गावचे पोलीस पाटील संतोष जानवळकर, सदस्य नथुराम जानवळकर, संदीप कोंडविलकर आदीउपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना संतोष पालशेतकर यांनी यापुढेही सामाजिक कार्यात झोकून देऊन सामाजिक काम करणार असून, विधायक उपक्रम राबवून तरुणांना एकत्र आणणार, असा विश्वास व्यक्त केला व समाजाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सल्लागार अशोक जानवळकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!