इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न; अध्यक्षपदी सुवर्णा चौधरी यांची निवड

रत्नागिरी : इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या नवीन वर्षाची सुरुवात १ जुलैपासून झाली. क्लबच्या नियमित सभेत साधेपणाने २०२६-२७ च्या पदाधिकाऱ्यांना माजी अध्यक्ष्या डॉ. स्वप्ना करे आणि ऋचा गांधी यांच्या हस्ते पदांची सूत्रे नवीन कार्यकारणीला सोपविण्यात आली.
नवीन कार्यकारिणीने जबाबदारी स्विकारत सामाजिक बांधिलकीच्या दिशेने वाटचालीस सुरुवात केली. इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठी महिला स्वयंसेवी संस्था आहे. मैत्री, समाजातील वंचित आणि गरजू लोकांना मदत तसेच जगभरातील संस्कृतींचा आदर करत मानवतावादी कार्यात योगदान देणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या सभेत सौ. सुवर्णा चौधरी यांनी अध्यक्षपदाची, डॉ. प्रियांका कांबळे यांनी सचिव पदाची, सौ आशा सनगर यांनी खजिनदारपदाची, तर आयएसओ प्रज्ञा गांधी यांनी सूत्रे हातात घेतली. यावेळी त्यांनी मुले, महिला, वृद्ध यांच्यासाठी तसेच पर्यावरण, आरोग्यविषयक जनजागृती यासाठी उपक्रम घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेत प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.



