भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने प्रभाग ७ मधील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य

रत्नागिरी : राज्याला विकासाची नवी दिशा देणारे, सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात सेवा-संकल्पाचे वारे वाहत आहेत. त्याच पावलावर पाऊल टाकत रत्नागिरी शहरात देखील “गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य” हा मंत्र घेऊन भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवला.
प्रभाग क्रमांक ७ मधील शासकीय शाळेत शिकणाऱ्या, होतकरू पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ एकदाच न राहता, दरवर्षी निलेश आखाडे यांच्या पुढाकाराने राबवला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे.
यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना साहित्य त्यांच्या घरी जाऊन, सन्मानाने देण्यात आले. गणवेश आणि नव्या वह्या-पॅड पेन पेन्सिल किट इतर साहित्य हातत पडताच मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
यावेळी बोलताना शहर सरचिटणीस निलेश आखाडे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या ‘अंत्योदय’ च्या विचाराला अनुसरूनच हा छोटासा प्रयत्न आहे. एकाही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये हीच आमची भावना आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्व दानशूरांचे मनापासून आभार.”
या सामाजिक उपक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, भाजपा पदाधिकारी विक्रम जैन, शहर सरचिटणीस व नगरसेवक संदीप सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत केली. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. ७ मधील दानशूर व्यक्तींनी देखील या उपक्रमासाठी निस्वार्थपणे योगदान दिले. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला.
याप्रसंगी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, सरचिटणीस संदीप सुर्वे, विक्रम जैन, शहराध्यक्षा भक्ती दळी, शैलेश बेर्डे, सोनाली केसरकर, निधी आखाडे, प्रज्ञा टाकळे, शैलेश बेर्डे, अजिंक्य केसरकर, जितेंद्र जाधव, तेजस पवार, पूजा पवार, नितीन गांगण, नरेंद्र रानडे, सचिन गांधी, राजेंद्र फाळके यांसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर, फळ वाटप, वह्या वाटप, ग्रामदेवतेकडे प्रार्थना असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातच निलेश आखाडे यांच्या या उपक्रमाने “शिक्षण हेच खरे दान” हा संदेश दिला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


