मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा बँकेच्या प्रगतीबद्दल आमदार भास्कर जाधव यांच्याकडून अभिनंदन

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केलेल्या केलेल्या प्रगतीबद्दल आमदार भास्कर जाधव यांनी समाधान व्यक्त करत बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.

एका विशेष पत्राद्वारे त्यांनी बँकेच्या कामगिरीचे कौतुक करत बँकेने सादर केलेला वार्षिक अहवाल अत्यंत समाधानकारक आणि प्रगतीचा आलेख उंचावणारा असल्याचे म्हटले आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना डिजिटल प्रवाहात आणून त्यांना डिजिटल बँकिंगचे व्यवहार शिकवण्यात बँकेने मोलाची व उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी कौतुक व्यक्त केले.

आमदार भास्कर जाधव यांच्या या सकारात्मक आणि कौतुकाच्या पत्रामुळे बँकेच्या संपूर्ण व्यवस्थापनाला एक नवी ऊर्जा मिळाली असून, बँकेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!