मुख्य बातमी
जिल्हा नियोजन समिती बैठक २७ जुलै रोजी

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (२७ जुलै) रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी दिली आहे.


