मुख्य बातमी

पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह ३० जुलै रोजी

रत्नागिरी : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे करण्यात आलेले आहे. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी नसल्यास www.mahasvayam.gov.in किंवा https://www.cmykpy.mahasvayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे परि. सहायक आयुक्त द. दि. चव्हाण यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या विभागाच्या www.mahasvayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये येताना मुलाखतीकरीता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!