मुख्य बातमी
मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी शाळा आणि अंगणवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पोशाख धारण करून दिंडी काढली.
दिंडीमध्ये निरक्षरांना साक्षर करण्यासाठी विविध प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेख मसरत, उपशिक्षक शहनाज भाटकर, अंगणवाडी सेविका सत्यश्री खर्डे, मदतनीस स्नेहा कुरतडकर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो सौजन्य : दिनेश पेटकर, गावखडी



