मुख्य बातमी
प्रतिपंढरपूर रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

रत्नागिरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. एकदाशीनिमित्त मंदिरात विठोबाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती.आजच्या पूजेचा मान जितेंद्र जोशी व सौ. राधिका जोशी दाम्पत्याला मिळाला.
दरम्यान, मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. भजन-कीर्तनाच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले होते आणि “विठ्ठल विठ्ठल” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.



