मुख्य बातमी

पाली येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

रत्नागिरी : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिं. प्र.), पाली येथे बुधवार, दि. २९ जुलै (आषाढ शु. १५, शके १९४८) रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजता षोडशोपचार पूजा होऊन भूपाळी आरती, श्री स्वामी गुरुपद मूर्ती पूजन, गुरुपदग्रहण, नित्य स्वाहाहाकार, नैवेद्य आरती, श्री स्वामी चरित्र पठण तसेच श्री कालभैरवाष्टक पठण व हवन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वाटप होणार असून, त्यानंतर भजन, सांस्कृतिक उपक्रम व मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी नैवेद्य आरती, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार आणि रात्री समारोपाने उत्सवाची सांगता होईल.

या पवित्र सोहळ्यास सर्व स्वामीभक्तांनी व भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिं. प्र.), पाली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!